Nigdi Crime News : किरकोळ कारणावरून वाद घालत एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – फायर फिटिंगच्या कामाच्या बिलाचा हिशोब व्यवस्थित न दिल्याच्या कारणावरून वाद घालत पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना 10 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सोनिगरा ज्वेलर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ह्यू इंडस्ट्रीज, चिंचवड येथे घडली.

कॉन्ट्रॅक्टर दत्तात्रय सूर्यवंशी, दत्तात्रय सूर्यवंशी याची पत्नी, मेव्हणा, दोन मुले (सर्व रा. आकुर्डी) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदेश ऋषभकुमार गंगवाल (वय 49, रा. मोशी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या साईटवरील फायर फिटिंगचे काम आरोपींनी केले. त्या कामाचा उर्वरित हिशोब आरोपींनी व्यवस्थित दिला नाही. याबाबत फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली असता आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांना हाताने, लाथा बुक्क्यांनी, बेल्ट आणि बुटाने मारहाण केली. शिवीगाळ करत मुकामार देऊन जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.