Nigdi Crime News : कंपनीतील सहकारी भागीदाराच्या 45 लाखांच्या फसवणुकीचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सहा जणांनी मिळून स्थापन केलेल्या कंपनीत 45 लाख रुपयांचा चेक भरतो, असे सांगून एका भागीदाराने त्रयस्थ व्यक्तीसोबत मिळून दुसरी कंपनी स्थापन केली. त्याने या दुसऱ्या कंपनीत 45 लाख रुपयांचा चेक भरण्याचा प्रयत्न केला. याबाबत दोन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 9 डिसेंबर 2020 ते तीन जून 2021 या कालावधीत अण्णासाहेब मगर बँक, आकुर्डी येथे घडला.

किशोर बंडु खूपसे, रियाज इमाम शेख (रा. कसबा पेठ, पुणे) गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत महादेव काशिनाथ लोखंडे (वय 47, रा. शिरगाव, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर याने फिर्यादी यांच्यासह इतर सहा जणांनी मिळून डीएसकेएल डेव्हलपर्स व बिल्डर प्रा. ली. ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या खात्यात 45 लाख रुपयांचा चेक भरतो, असे किशोर यांनी सांगितले. मात्र, कंपनीच्या खात्यात चेक न भरता आरोपी किशोर याने त्याचा साथीदार रियाज याच्या सोबत मिळून दुसरीच डीएसकेएल डेव्हलपर्स नावाची कंपनी स्थापन केली.

या कंपनीच्या नावाने अण्णासाहेब मगर सहकारी बँक, आकुर्डी या शाखेत खाते उघडून त्यात 45 लाखांचा चेक भरला. मात्र वेळीच हा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी बँकेकडे संपर्क करून फसवणुकीचा प्रकार टाळला.

निगडी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.