Nigdi crime News : मारहाण करून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले

एमपीसी न्यूज – दोघांना शिवीगाळ करत मारहाण करून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. ही घटना बुधवारी (दि. 7) रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

प्रदीप कृष्णा आंबीलवाले (वय 20, रा. दत्तवाडी, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश युवराज कदम (वय 22, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप याने फिर्यादी आकाश आणि त्यांचा मित्र संदेश पाटील यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करून संदेश पाटील यांना विटेने डोळ्यावर मारून दुखापत केली.

जबरदस्तीने धमकावून फिर्यादी यांना 889 रुपये गुगल पे द्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.