Talegaon crime News : कत्तलीसाठी जनावरे नेणा-या तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – कत्तल करण्यासाठी जनावरांना पिकअप टेम्पोमधून घेऊन जाणा-या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 8) सकाळी साडेआठ वाजता मावळ तालुक्यातील मंगळूर रोडवर घडली.

शोएब कुरेशी, बापू गायकवाड, अमोल शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवांकुर गिरीश खेर (वय 26, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कत्तल करण्यासाठी जनावरांना एका पिकअप टेम्पोमध्ये (एमएच 12 / आरए 0490) निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते.

पोलिसांनी या टेम्पोवर कारवाई करत तिघांच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11 (1) ड, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 9, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.