Maval News : जयंतीची तयारी करत असताना किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज –  शिवजयंतीची तयारी करत असताना किरकोळ कारणावरून चार ते पाच विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. (Maval News) ही घटना शनिवारी (दि.17)  मावळातील सदुंबरे गावातील सिद्धांत महाविद्यालयात घडली आहे.

याप्रकऱणी ओम विजय शिंदे (वय 18 रा.मोशी गावठाण) याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून राज बेहरा, ओंकार बोरकर, संस्कार गाडे, विनय गाडे, साहील बरकर, प्रतीक गाडे व त्याचे 2 ते 3 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade News : लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हि शिवजयंतीची तयारी करत होते. यावेळी शोभकामाचे पेपर प्लास्टिंग मशिनला लाथ मारल्याचा फिर्यादी यांनी जाब (Maval News) विचारला याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला हाताने व बांबूने मारहाण करत जखमी केले. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.