Nigdi Crime News : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेने तंबाखू न दिल्याच्या कारणावरून दोघांनी तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 4) दुपारी लहुजी वस्ताद झोपडपट्टी, प्राधिकरण निगडी येथे घडली.

बाळू मुजमुले (वय 60), दीपक मुजमुले (वय 22, दोघे रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, प्राधिकरण निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर तंबाखू चोळत उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी दीपक हा दारू पिऊन आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे तंबाखू मागितली. मात्र फिर्यादी यांनी त्यास तंबाखू देण्यास नकार दिला. या कारणावरून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपी बाळू तिथे आला. त्याने दीपकच्या कानाखाली मारल्या. तरीही दीपक फिर्यादी यांना शिव्या देत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी देखील दीपकला शिवीगाळ केली. त्यावरून आरोपी बाळू याने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.