Nigdi Crime News : विवाहित पुरुषाकडून लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार ; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – पहिले लग्न झालेल्या एका पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेनं निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.1) दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राकेश दिलीप शिंदे (रा. ओटास्किम, निगडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीचे पहिले लग्न झाले असताना देखील त्याने फिर्यादी महिलेला विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दिले. तसेच, तिला शिवीगाळ करत मारहाण केली आणि ‘पोटातील बाळ पाडून टाक’, अशी धमकी दिली.

आरोपीने 25 डिसेंबरला फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचं फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि. एम. धुमाळ करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.