Pimple Saudagar News: आमदार अरुण लाड यांची नाना काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार अरूण लाड यांनी आज (शनिवारी) माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी नगरसेवक शंकर काटे, नगरसेविका शितल काटे यांनी आमदार अरुण लाड यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पिंपरी-चिंचवड पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष महादेव पाटील आदी उपस्थित होते.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने उदध्वस्त केला आहे. अरुण लाड यांनी भाजप उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. निवडणुकीत केलेल्या सहकार्य केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आमदार अरुण लाड आभार मानत आहेत. यासाठी त्यांचा आभार दौरा सुरु आहे.

त्याअंतर्गत आमदार लाड यांनी आज नाना काटे यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांचे आभार मानले. तसेच शिवसेना गटनेते राहुल कलाटे, सुलभा उबाळे यांचे देखील आमदार लाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.