Dehuroad Crime News : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – कंपनीचा स्क्रॅप माल सोडण्यासाठी आलेल्या कामगारांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.31) रात्री सव्वा दहाच्या सुमारास किवळे येथे ही घटना घडली.

अनुराग नागेश तेलगु (वय 31, रा. गांधीनगर, देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राकेश नंदू जगताप (वय 36, रा. पिंपळे, ता. पुरंदर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र गोव्यातील कंपनीतून आणलेला स्क्रॅप माल किवळे येथील कंपनीत सोडण्यासाठी आले होते. त्यावेळी जेवण करण्यासाठी ते किवळे येथे रस्त्यालगत थांबले असताना अटक आरोपी व इतर दोघेजण त्याठिकाणी आले.

आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून तसेच दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दाखल फिर्यादी नुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.