Nigdi Crime News : अंकुश चौकात टेम्पोच्या काचा फोडून टोळक्याची दहशत

एमपीसी न्युज: अंकुश चौक, निगडी येथे तीन जणांनी टेम्पोच्या काचा फोडून आणि हत्यारे उगारून दहशत निर्माण केली. रविवारी (दि. 3) रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली.

नफिझ शेख यांनी याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी मुस्ताक मज्सीद शेख (32, रा.आकुर्डी), इम्तीयाज मुस्ताक (25, रा. फातिमा मस्जिदजवळ) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

आरोपींनी नफिझ शेख यांच्या टेम्पोच्या डाव्या दरवाजाच्या काचा फोडल्या. नफिझ शेख आणि त्यांचा मेहुणा गाडीजवळ जायला लागताच आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी कोयता आणि हत्यारे उगारली. त्यामुळे नफिझ शेख आणि त्यांचा मेहुणा बाजूलाच थांबले. यावेळी आरोपींनी टेम्पोचे डॅशबोर्ड उचकटून त्यातून तीन हजार रुपयांची चोरी केली.

पोलिस उपनिरीक्षक वांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1