Nigdi Crime News : कोयता बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अंकुश चौकाजवळ, निगडी येथे करण्यात आली.

स्वप्निल उर्फ युवराज सुरेश गायकवाड (वय 23, रा. गायकवाड कॉम्प्लेक्स, उरुळी कांचन) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई रामदास मोहिते यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल गायकवाड बेकायदेशीरपणे अंकुश चौक निगडी येथे कोयता घेऊन आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून स्वप्निल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून शंभर रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.

याबाबत त्याच्या विरोधात आर्म ॲक्ट कलम 4 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.