Nigdi : निगडी प्राधिकरण येथे रविवारपासून दिवाळी फेस्टिवल धमाका

एमपीसी न्यूज – दृष्टी कम्युनिकेशन्स अॅण्ड मार्केटींगच्या वतीने 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान निगडी प्राधिकरण सेक्टर 27 अ मधील महापौर निवास मैदानावर दिवाळी फेस्टिवल धमाका या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे मुख्य संयोजक शर्मिला महाजन व प्रमोद झोळ यांनी दिली.

दिवाळीनिमित्त प्राधिकरणात अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. यात विविध प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे भरपूर स्टॉल असणार आहेत. अनेक नामांकित ब्रॅंडचे स्टॉल देखील या प्रदर्शनात असणार आहेत. याखेरीज मनोरंजन, बालजत्रा व खवय्यांसाठी फूड फेस्टीवल देखील असणार आहे. दुपारी 12 ते रात्री 10 अशी या प्रदर्शनाची वेळ आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनात 21 व 22 ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता भावतरंग हा सहाबहार हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार असून 23 ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता चंद्र आहे साक्षीला हा कोजागरी स्पेशल हिंदी-मराठी गाण्यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. मैत्रिणी ग्रुप तसेच कल्याणी रेळेकर, सुनंदा सुपनेकर, हिमाली प्रधान यांनी संयोजनात सहाय्य केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीबरोबरच फूड फेस्टीवल व मनोरंजनाचाही आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.