Nigdi : पोलिसात तक्रार दिल्याचा जाब विचारत सासूला मारहाण; जावयाला अटक

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार अर्ज का केला, असे म्हणत जावयाने सासूच्या डोक्यात फारशीचा तुकडा मारला. तर जावयाच्या आईने सासूचा चावा घेऊन तिला जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी सव्वाबारा वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.

बाबासाहेब कांबळे (वय 37) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. त्याच्यासह त्याची आई सुमन कांबळे (वय 50, दोघे रा. ओटास्किम, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंद्रकला मगर सरोदे (वय 55, रा. ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास फिर्यादी चंद्रकला आणि त्यांची मुलगी घरी जात होत्या. ओटास्किम येथे संजयनगर समाज मंदिराच्या मागे आरोपी जावई बाबासाहेब आणि त्याची आई सुमन या दोघांनी फिर्यादी यांना अडवले. फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला ‘माझ्या विरोधात पोलिसात अर्ज का केला’, असे म्हणत शिवीगाळ केली.

बाबासाहेब याने फरशीचा तुकडा चंद्रकला यांच्या डोक्यात मारला. तर बाबासाहेबच्या आईने फिर्यादी यांच्या मांडीला चावा घेऊन जखमी केले. पोलिसांनी बाबासाहेब याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.