Nigdi News : मॉडर्न हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात मुलांनी जिंकली उपस्थितांची मने

एमपीसी न्यूज – निगडीतील मॉडर्न हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात पार(Nigdi News) पडला.यावेळी चिमुकल्यांनी जी नृत्य सादर केली त्यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध होऊन गेले होते.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी चे उपप्राचार्य डॉ. एन. बी. चोपडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चिंतामणी घाटे तसेच कार्यक्रमासाठी संस्थेचे मृगजा कुलकर्णी, आजीव सदस्य राजीव कुटे , नगरसेवक उत्तम केंदळे, पालक संघाच्या उपाध्यक्ष कांचन पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. पांडुरंग मराडे, शिशुविभागाच्या मुख्याध्यापिका संगीता घुले, शिक्षक प्रतिनिधी गौरी देशपांडे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.

Governor of Maharashtra : मला पदमुक्त करा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या सुमधुर आवाजात ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले.स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे यांनी शाळेत राबवित असणारे विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दहावी गुणवंत विद्यार्थी , शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, तसेच इतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा (Nigdi News) स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात पाचवी ते नववीच्या 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये गणेशवंदना, कोळीगीत देशभक्तीपर गीत, गोंधळ, वाद्यांची जुगलबंदी, पोवाडा, शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नृत्य असे विविध नृत्य अविष्कार घेऊन विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.संपूर्ण विविध गुणदर्शनाचे निवेदन अधिकारी मीना यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार शाळेच्या पर्यवेक्षिका पाचारणे वर्षा यांनी केले. शाळेच्या प्रमुख्याध्यापिका मृगजाताई कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालक मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. गजानन एकबोटे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.तर गौरी देशपांडे यांनी आलेल्या सर्व अतिथींचे(Nigdi News) पालकांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.