Nigdi News: ‘प्लॅगोथॉन’मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, स्पाईन रोड, अंकुश चौक केला चकाचक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण” 2022 अंतर्गत सेक्टर 21 मध्ये आयोजित केलेल्या  ‘प्लॅगोथॉन’ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छेत महापालिकेला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.   स्पाईन रोड, अंकुशचौकातील कचरा उचलून रस्ता चकाचक केला.

भक्ती – शक्ती येथील स्पाईन रोड, अंकुश चौकांपासून ‘प्लॅगोथॉन’ची सुरुवात करून अण्णाभाऊ साठे चौका पर्यंत चालता – चालता कचरा वेचण्यात आला.  यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मधील, महीला बचत गट,जेष्ठ नागरिक संघ, सामाजिक कार्यकर्ते यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. महापालिका स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये देशात क्रमांक एक यावी यासाठी सर्वोत्तरीने प्रयत्न करत आहे. या स्वच्छाग्रह मोहिमेला नागरीकांची साथ मिळत असल्याने उपक्रम यशस्वी ठरत आहे.    ‘प्लॅगोथॉन’ उपक्रमाद्वारे प्रभाग क्रमांक 13 मधील, स्पाईन रोड पूर्णपणे स्वच्छ करत अंकुश चौकांमध्ये जनवाणी संस्थेच्या पर्यवेक्षकांनी पथनाट्य सादर केले.

यात ‘फ’क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आरोग्य अधिकारी वाघमारे सर, प्रभाग क्रमांक 13 चे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, सागर कोरे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका कमल घोलप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते, सामाजिक कार्यकर्ते रियाज खान, राजू खाडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सारिका कोलते, प्रिया कोलते, मेघा आठवले, रेश्मा साळवे तसेच जनवाणी संस्थेचे सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.