Nigdi News : दिल्ली क्रीडा शिक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप संपन्न

एमपीसी न्यूज – ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाने (Nigdi News) डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन, जीएनसीटीडी आणि डीआयईटी/एससीईआररटी यांच्या माध्यमातून दिल्ली पब्लिक स्कूलच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांसाठी 19 जून ते 22 जून या कालावधीत शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे प्रशिक्षण शिबिराचा 22 जून रोजी विद्यालयातील मनोहर वाढोकर सभागृहात समारोप संपन्न झाला.

यावेळी दिल्ली एससीईआररटी अधिकारी राकेश कोठारी, सरला देवी, निवृत्त शिक्षण उपसंचालिका निरुपमा अभ्यंकर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे पाटील या समोरोप सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमास ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्र व्यवस्थापक आदित्य शिंदे आणि केंद्राचे प्रशासन प्रमुख शिवराज पिंपुडे सुद्धा उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांपैकी एससीईआररटीच्या अधिकारी सरला देवी आपल्या भाषणात म्हणाल्या की आमच्यासाठी उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी ऊर्जा घेऊनच येतो. झालेल्या सत्रांचा आधार घेत त्या पुढे म्हणाल्या एक शारीरिक शिक्षक म्हणून आपण आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या भारतीय परंपरेतील खेळांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, आपल्या भारतीय परंपरागत अशा खेळांचे जतन आणि उन्नयन करणे आणि असे परंपरागत खेळ हे पुढील पिढीला शिकवणं ही शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे.

कोठारी सरांनी प्रबोधिनीमधील शारीरिक शिक्षणासाठी होत असलेल्या नियोजनाचे (Nigdi News) कौतुक केले. विविध पातळ्यांवरुन दिले जाणारे शिक्षणाचे असे संस्कार त्यासाठी त्याला जोडून दिलेले विविध उपक्रम हे सर्व पाहणं आणि अनुभवणं हे आम्हा दिल्लीवासीयांसाठी एक आनंदाचा सोहळा होता.

पांडे सर शिक्षणाविषयी भाष्य करताना म्हणाले की, नुसत्याच अध्यापन निष्पत्तीवरतीवर चर्चा नको, तर मुलांशी जवळीक साधणं, त्यांना आपल्या परिवारातील घटक मानणं आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं हे महत्त्वाचं आहे. प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ते पुढे असेही म्हणाले की, दिल्लीमधील एकूण हजार विद्यार्थ्यांपैकी तुम्ही निवडलेले 38 विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणजे 38 हिरे आहात.

आज येथून प्रशिक्षण घेऊन जेव्हा आपापल्या ठिकाणी तुम्ही जाल तेव्हा तिकडच्या सहकाऱ्यांना प्रेरणा द्या. त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेतून आपली आणि आपल्या शाळेची उन्नती करून घ्या. या प्रशिक्षणानिमित्त ज्ञान प्रबोधिनी व एससीईआररटीचे जे आपुलकीचे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे ते पुढील काळातही असेच टिकून ठेवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जांभळे पाटील यांनी पिंपरी चिंचवड म.न.पा. प्रशासनाने खेळाडूंसाठी तयार केलेल्या मूलभूत सुविधांवर प्रकाश टाकला. परंतु, त्यामानाने खेळाडू घडण्याची प्रक्रिया ही खूपच कमी असल्याची खंतही व्यक्त केली. दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी जसा हा प्रशिक्षण कार्यक्रम ज्ञान प्रबोधिनीने राबवला तसाच पिंपरी चिंचवड शाळांमधील प्रशिक्षकांसाठी राबवावा. तशी जबाबदारी घ्यावी. अशी विनंतीही या वेळी त्यांनी केली.

सुमारे 38 प्रशिक्षणार्थी व 2 अधिकारी या 19 ते 22 जून रोजी झालेल्या प्रशिक्षणात सहभागी होते. या चार दिवसीय प्रशिक्षणातील सुनियोजन, सत्रांचे उत्तम आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आणि अशा प्रकारची प्रशिक्षणे वरचेवर होत राहिली पाहिजेत अशी आशाही व्यक्त केली.

प्रशिक्षणामध्ये सहभागी असलेल्यांपैकी दोन प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव सांगितले. प्रबोधिनीतील विविध उपक्रमांची माहिती घेऊन आम्हाला कशी मोठ्या अनुभवाची शिदोरी येथून मिळाली आहे, असे बोलणे या निमित्ताने त्यांचे झाले. त्याबरोबरीने कौशल्य प्रशिक्षण, आदरातिथ्य व जेवण व्यवस्थेबद्दलचा तर आनंद व्यक्त केलाच पण हे प्रशिक्षण दहा दिवस असावे अशी इच्छाही व्यक्त केली.

दिल्ली स्कूलच्या अध्यापिका श्रद्धा मिश्रा यांनी गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. तर प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींनी कुडो ,योगासन लेझीम, बर्ची, लाठीकाठीचे सादरीकरण प्रमुख पाहुण्यांसमोर केले. कार्यक्रमाचा समारोप ज्ञान प्रबोधिनीचे प्राचार्य माननीय मनोज देवळेकर सरांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका विद्या उदास यांनी केले.

Chinchwad : महिलेला वर्क फ्रॉम होम पडले महागात; साडेसात लाखांची झाली फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.