Chinchwad : महिलेला वर्क फ्रॉम होम पडले महागात; साडेसात लाखांची झाली फसवणूक

एमपीसी न्यूज – एका महिलेला वर्क फ्रॉम होम चांगलेच  (Chinchwad) महागात पडले आहे. काम करण्यासाठी डेटा विकत घ्यावा लागेल असे सांगत महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 9 ते 14 एप्रिल या कालावधीत लिंक रोड, चिंचवड येथे घडला.

मेरीकॉर व शगुन, 91574186363 मोबाईल धारक, सात बँक खाते धारक आणि एक फोन पे धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी थोडी रक्कम भरून डेटा विकत घेण्यास सांगितले. ऑनलाईन ऑर्डर पूर्ण केल्यास चांगली रक्कम मिळेल असे आमिष दाखवून वारंवार (Chinchwad) डेटा विकत घेण्याचा बहाणा करून सात लाख 50 हजार 736 रुपयांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Chinchwad : खाकितले पोलीस नागरिकांना दिसायला हवेत; व्हिजिबल पोलिसिंगसाठी आयुक्तांचे आदेश

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.