Pune : पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती व तक्रार आता टॉयलेट सेवा ॲपवर!

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची (Pune) माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच स्वच्छतागृहांमधील पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेसंदर्भात तक्रारही ‘टॉयलेट सेवा ॲप’वर करता येणार आहे. या उपयोजन (ॲप) नागरिकांच्या वापरासाठी गुरुवारपासून (दि.22) सुरू करण्यात आले.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती काय आहे, ती कुठल्या भागात आहेत, याची माहिती या उपयोजनावर आहे. अमोल भिंगे यांनी हे उपयोजन (ॲप) विकसित केले आहे.

शहरातील एक हजार 183 सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या उपयोजनाच्या माध्यमातून स्वच्छतागृह शोधणे, स्वच्छतागृहात असलेल्या सुविधांची माहिती घेणे शक्य होणार आहे. स्वच्छतागृहाचे ठिकाण कुठे आहे, हे ही या माध्यमातून कळणार आहे.

वॉशबेसिन, पाणी, जंतुनाशक द्रावण, साबण, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन अशा सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती या ॲपमध्ये स्वतंत्रपणे मिळणार आहे.

स्वच्छतागृहातील (Pune) पायाभूत सुविधांबाबत नागरिकांना गुणांकन देण्याची सुविधाही ॲपमध्ये देण्यात आली आहे. तसेच तक्रार नोंदवता येणार आहे.

Nigdi News : दिल्ली क्रीडा शिक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप संपन्न

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.