Pune : हॉकीमध्ये यजमान एसएनबीपीला दुहेरी मुकुट

एमपीसी न्यूज : यजमान एसएनबीपी, मोरवाडी संघाने ‘सुभद्रा’ आंतरशालेय (Pune) क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना 15 वर्षांखालील गटातून मुले, मुलींच्या विभागात विजेतेपद मिळविले.

संस्थेच्या चिखली येथील डॉ. दशरथ भोसले हॉकी मैदानावर झालेल्या सामन्यात मुलांच्या विभागात अंतिम लढतीत एसएनबीपीने नाशिकच्या के.एन. केला प्रशाला संघाचा एका गोलच्या पिछाडीनंतर 3-1 असा पराभव केला. केला प्रशालेकडून सिकंदर शेखने 25व्या मिनिटाला गोल लकरून संघाचे खाते उघडले होते.

मध्यंतराला त्यांनी आघाडी कायम राखली होती. उत्तरार्धात अथर्व कुमारने 28व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-1 अशी  बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर नीरज लांडगेने 39 आणि 45 व्या मिनिटाला गोल करून एसएनबीपीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

मुलींच्या विभागातील अंतिम सामन्यात एसएनबीपी मोरवाडी संघानेच विजेतेपदाला गवसणी घालताना आपल्याच चिखली येथील संघाचा 8-1 असा धुव्वा उडवला. सुकन्या सायाकर (3रे, 14वे आणि 18वे मिनिट) आणि मैथिली भुजबळ (12, 13 आणि 17 वे मिनिट) दोघींनी साधलेली हॅटट्रिक संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

साई सपकाळ (11 वे मिनिट) आणि तनिष्का जाधव (15 वे मिनिट) यांनी अन्य गोल केले. चिखली संघाकडून एकमात्र गोल उन्ना शेखने 8व्या मिनिटाला केला.

स्पर्धेत एकूण सहा शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एसएनबीपी मोरवाडी, एसएनबीपी (Pune) चिखली, के. एन. केला स्कूल, नाशिक, ज्योती स्कूल, सेंट ज्यूड स्कूल, सेंट अॅण्ड्र्यूज स्कूल या संघाचा समावेश होता. मुलींच्या विभागातून 4 संघ सहभागी झाले होते.

निकाल –

मुले (15 वर्षांखालील) अंतिम सामना – एसएनबीपी, मोरवाडी 3 (अथर्व कुमार 28 वे, नीरज लांडगे 39, 45वे मिनिट) वि.वि. के.एन. केला स्कूल, नाशिक 1 (सिकंदर शेख 25वे मिनिट) मध्यंतर 0-1

उपांत्य फेरी – एसएनबीपी मोरवाडी 4 (नीरज लांडगे 4थे, अथर्व कुमार 13, 14वे मिनिट, यश लांडे 25वे मिनिट) वि.वि. ज्योती स्कूल 1 (अयान सय्यद 25वे मिनिट) मध्यंतर 3-0

उपांत्य फेरी 2 – के.एन. केला स्कूल नाशिक 3 (अभिषेक मुळे 2रे मिनिट, जयेश फुलपगारे 4थे मिनिट, इक्बाल पटेल 8वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी, चिखली 0. मध्यंतर 3-0

पहिली फेरी – एसएनबीपी, चिखली 1 (नरेश कोठारी 10वे मिनिट) वि.वि. सेंट अॅण्ड्र्यूज स्कूल 1. मध्यंतर – 1-0
ज्योती शाळा 1 (विवेक भामरे 13वे मिनिट) वि.वि. जयहिंद हायस्कूल 0, मध्यंतर 1-0

मुली अंतिम फेरी – एसएनबीपरी मोरवाडी 8 (सुकन्या सयाकर 3, 4, 18वे मिनिट, सई सकपाळ 11वे, मैथिली भुजबळ 12, 13, 17वे मिनिट, तनिष्का जाधव 15वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी चिखली 1 (उन्ना 8वे मिनिट) मध्यंतर 6-1

उपांत्य फेरी 1 – एसएनबीपी चिखली 2 (गार्गी रासकर 5वे, दिप्ती कुमारी 24वे मिनिट) वि.वि. सेंट ज्युड प्रशाला 0 मध्यंतर 1-0

उपांत्य फेरी 2 – एसएनबीपी मोरवाडी 6 (साई सपकाळ 5वे मिनिट, रिया पिल्ले 10वे, रितिका पवार 12वे मिनिट, मैथिली भुजबळ 18, 34वे मिनिट, तनिष्का जाधव 0 वि.वि. सेंट अॅण्ड्यूज प्रशाला 0 मध्यंतर 3-0.

Pune : पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती व तक्रार आता टॉयलेट सेवा ॲपवर!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.