Nigdi News : अंध अपंग नागरिकांना निगडी पोलिसांकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निगडी पोलिसांकडून मास्क, सॅनिटाझर आणि हॅण्डग्लोव्हज्‌‌चे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलीस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. कर्तव्य बाजावतानाच पोलीस माणूसकीचे दर्शन देखील घडवत आहेत.

निगडी मधील सेक्टर 22 मध्ये हे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस अंमलदार विलास केकाण, सतीश ढोले आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी निगडी पोलिसांनी पुढाकार घेऊन निगडी परिसरात ठिकठिकाणी गरजू नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. अंध, अपंग आणि गरीब वर्गातील नागरिक स्वसंरक्षणासाठी देखील मास्क सॅनिटायझर घेऊ शकत नाहीत. अशा नागरिकांना कोरोनापासून बचावाची सुरक्षा साधने वाटण्यात आली.

कोरोना या विषाणूबाबत घ्यावयाच्या खबरदारीची माहितीही नागरिकांना यावेळी पोलिसांनी दिली. ‘कोरोना’ हा विषाणू जीवघेणा नाही. परंतु, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे व निगडीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणेश जवादवाड यांनी केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.