Nigdi : पुणे बिझनेस स्कूलला ‘इंडिया एक्सलन्स अवाॅर्ड’ प्रदान

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील (Nigdi) शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या पीसीईटी संचलित पुणे बिझनेस स्कूलला 2022-23 या वर्षासाठी महाराष्ट्रातील टॉप इमर्जिंग बिझनेस स्कूल म्हणून प्रतिष्ठेचा ‘इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते पुणे बिझनेस स्कूलचे संचालक डॉ. गणेश राव यांनी पुरस्कार स्वीकारला.

यावेळी सुनील गावसकर यांनी भविष्यातील कॉर्पोरेट प्रतिभांना मार्गदर्शन करण्याचे चांगले कार्य सुरू ठेवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था व प्रतिनिधींना प्रोत्साहित केले. यावेळी प्रमुख शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

Pimpri : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या निर्णयाचे कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पेढे वाटून स्वागत

डॉ. गणेश राव यांनी पुणे बिझनेस स्कूलमध्ये दिले जाणारे कॉर्पोरेट ओरिएंटेड व्यवसाय शिक्षण या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. तसेच पुणे बिझनेस स्कूल शैक्षणिक, उद्योगातील दरी कमी करण्यासाठी कसे प्रयत्न करत आहे याबाबत माहिती दिली. पुणे बिझनेस स्कूलला औद्योगिक विभागातील नामांकित कंपन्यांचे, सेंटर फॉर एचआर एक्सलन्स आणि सल्लागार मंडळाचे सहकार्य आहे असे डॉ. राव यांनी सांगितले.

पुणे बिझनेस स्कूलचा गौरव करण्यात आल्याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव (Nigdi) विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्राचार्य डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी आणि शिक्षक वृंद, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.