Akurdi : आकुर्डी रेल्वे स्थानकावर लिफ्ट, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून (Akurdi) अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात चिंचवड, आकुर्डी रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आकुर्डी स्थानकात प्रवाशांसाठी उभारलेल्या लिफ्टचे लोकार्पण खासदार बारणे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

यावेळी पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदूराणी दुबे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब (Akurdi) वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, बशीर सुतार उपस्थित होते. आकुर्डी रेल्वे स्थानकावर दोन्ही फलाटांवर उद्वाहन (लिफ्ट) बसवण्यात आली आहे. एका बाजुच्या लिफ्टचे आज लोकार्पण करण्यात आले. या स्थानकावरून पुणे आणि लोणावळा या दोन्ही बाजूला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे.

Mp Shrirang Barne : शहरातील रस्त्यांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करा

एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी वृद्ध प्रवाशांना पायऱ्यांचा जिना चढण्यास अडचणी येतात. वृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुले यांना या लिफ्टचा फायदा होईल. सामानाच्या मोठ्या पिशव्या घेऊन चढण्याचा वेळ वाचून लिफ्टने सामानाच्या पिशव्या नेता येतील. लिफ्टची एक हजार वजनाची क्षमता आहे. दुस-या बाजुच्या लिफ्टचे महिन्याभरात काम पूर्ण होईल.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळमधील रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड आणि तळेगावदाभाडे या चार रेल्वे स्थानकांचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्थानकाचे विस्तारीकरण होत आहे. या योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी 40 कोटी 35 लाख तर आकुर्डीसाठी 33 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

यामध्ये रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा रुम, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी-सुविधा, पर्यावरणपूरक वातारण, आवश्यकतेनुसार लिफ्ट, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

पुणे ते लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल चालू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. देखभालाची वेळ बदलून दुपारच्या वेळेस रेल्वे चालू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच दुपारीही रेल्वे सेवा सुरु होईल, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.