Khed : बैल पोळ्याला डीजे लावल्यावरून दोन गटात वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बैल पोळ्याला डीजे लावल्याच्या वादावरून (Khed) खेड तालुक्यातील दत्तनगर धामणी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री घडली.

बाबाजी रामदास कोळेकर (वय 30, रा. दत्तनगर, धामणी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण बबन कोळेकर, समीर गोरक्ष कोळेकर, शिवाजी मोहन कोळेकर, वेदांत सुदाम कोळेकर, अविनाश रमेश कोळेकर, संभाजी गोविंद कोळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात समीर गोरक्षनाथ कोळेकर (वय 24, रा. दत्तनगर, धामणी, ता. खेड) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार बाबाजी रामदास कोळेकर, शुभम सुभाष कोळेकर, संदीप मोहन कोळेकर, संकेत माणिक कोळेकर, काळूराम मोहन कोळेकर, लक्ष्मण शांताराम कोळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या निर्णयाचे कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पेढे वाटून स्वागत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी बैल पोळ्याच्या दिवशी दोन्ही गटात भांडण झाले होते. ते भांडण (Khed) मिटविण्यासाठी दोन्ही गटातील व्यक्ती 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकत्र आले. त्यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली. दोन्ही गटातील 11 जणांना अटक करण्यात आली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.