Pune : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर मधून सुटणार चार विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेने नागपूर येथून (Pune) मुंबई, सोलापूर आणि पुणे शहरांसाठी चार विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यभरातून अनुयायी नागपूर येथे एकत्र येतात. त्यांना परतीच्या प्रवासासाठी रेल्वेने ही सोय उपलब्ध केली आहे.

नागपुर-मुंबई एलटीटी वन वे विशेष रेल्वे (20 आईसीएफ कोच)
01018 वन-वे विशेष रेल्वे 24 ऑक्टोबर (मंगळवार) रात्री ०8.00 वाजता नागपूर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

Akurdi :आकुर्डी रेल्वे स्थानकावर लिफ्ट, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण

ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, (Pune)चांदूर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापुर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आदि स्थानकांवर थांबेल. संरचना – 5 द्वितीय श्रेणी सिटिंग, 15 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असेल.

 

नागपूर-पुणे वन वे विशेष रेल्वे (24 आईसीएफ कोच)

01030 वन-वे विशेष रेल्वे 24 ऑक्टोबर (मंगळवार) रात्री 11.00 वाजता नागपूर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 05.45 वाजता पुणे येथे पोहोचेल.

 

ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापुर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि पुणे आदी स्थानकांवर थांबेल. संरचना – एक वातानुकूलित 2-टियर, दोन वातानुकूलित 3-टियर, 13 स्लीपर, 8 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज सह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.

 

नागपूर-मुंबई, एलटीटी वन वे विशेष रेल्वे (24 आईसीएफ कोच)

01032 वन-वे विशेष रेल्वे 25 ऑक्टोबर (बुधवार) दुपारी 03.00 वाजता नागपूर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 08.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापुर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस आदी स्थानकावर थांबेल. संरचना – 24 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज सह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.

सोलापूर-नागपूर वन वे विशेष रेल्वे (24 आईसीएफ कोच)

01029 वन-वे सुपरफास्ट विशेष रेल्वे 24 ऑक्टोबर रोजी (मंगळवार) रात्री 08.20 वाजता सोलापूर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी 01.05 वाजता नागपूर येथे पोहोचेल.

 

ही गाडी कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापुर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगांव, वर्धा आदि स्थानकांवर थांबेल. संरचना – 24 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज सह गार्ड के ब्रेक व्हॅन असेल.

वरील सर्व गाड्यांचे तिकीट बुकिंग शुक्रवार (दि. 20 ऑक्टोबर) पासून सुरु होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.