Charholi Budruk :चौथ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकामाच्या साईटवर चौथ्या मजल्यावरून पडल्याने (Charholi Budruk) कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता चऱ्होली बुद्रुक येथील भोईआळी येथे घडली.

शुभमकुमार जितेंद्रकुमार सिंह (वय 21, रा. चऱ्होली) असे मृत्यू झालेल्या (Charholi Budruk)कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम सुपरवायझर दीपक तापकीर (वय ५१, रा. चऱ्होली बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार रामदास चांगदेव बहिरट यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर मधून सुटणार चार विशेष रेल्वे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईआळी येथे वैभव क्लॉथ सेंटरच्या वरच्या बाजूला बांधकाम सुरु आहे. त्या कामावर आरोपीने कामगारांना सुरक्षा पुरवली नाही. दरम्यान चौथ्या मजल्यावर काम करत असताना शुभमकुमार हा तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.