Tathawade : कारची काच फोडून लॅपटॉप पळवला

एमपीसी न्यूज – कारची काच फोडून चोरट्याने लॅपटॉप आणि स्मार्ट वॉच चोरून नेले. (Tathawade) ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री आठ ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथील स्टेटस इन हॉटेल समोर घडली.

राहुल गोरखनाथ बोऱ्हाडे (वय 33, रा. औंध, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस (Tathawade) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर मधून सुटणार चार विशेष रेल्वे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची कार (एमएच 17/सीआर 7979) स्टेटस इन हॉटेलजवळ पार्क केली. अज्ञात चोरट्याने कारची मागील बाजूची काच फोडून कार मधून 30 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, दोन हजार रुपयांचे स्मार्ट वॉच आणि बँकेची कागदपत्रे चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.