Nigdi: रोटरी क्लब ऑफ निगडीकडून ‘यशोदा अमृतवाहिनी’ या मातृ दुग्ध पेढीचे लोकार्पण

Nigdi: Rotary Club of Nigdi Dedicates 'Yashoda Amrutvahini' of maternal dairy firm मिल्क बँक सुरू झाल्यापासून आतापर्यंत 10 हजारांहून अधिक मातांनी सुमारे 2300 लिटर दुध मातृदुग्ध पेढीत दान केले आहे.

एमपीसी न्यूज- डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अद्ययावत यशोदा मातृ दुग्ध पेढीच्या सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्याकडून यशोदा अमृतवाहिनी ही वाहिका प्रदान करण्यात आली. ग्लोबल ग्रॅन्डच्या माध्यमांतून रोटरी क्लबच्यावतीने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या प्रांगणात अमृतवाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.

या उपक्रमासाठी कॉटमॅक संस्थेचे अर्थ सहाय्य लाभले. याकरिता आर्थिक निधी, वाहनाचे रंगकाम, बांधणी आदी वेळेत पूर्ण व्हावेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे आज हे शक्य झाले असे मत रोटरी क्लब निगडीचे माजी अध्यक्ष रवी राजापूरकर यांनी व्यक्त केले.

ज्या माता इतर बाळांसाठी दूधदान करू इच्छितात व ज्या नवजात बालकांना दुधाची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल. आम्हाला नक्की विश्वास आहे ही अमृत वाहिनी नवजात बालकांसाठी जीवनदायनी ठरेल, असे मत डॉ शुभांगी कोठारी यांनी व्यक्त केले.

2013 पासून ह्यूमन मिल्क बँक सुरु झाली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या सहकार्यामुळे सुरु झाली.

रोटरी क्लबकडून मिळालेल्या या अमृतवाहिनीचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्या स्तनदा माता आपले जास्तीचे दूध दान करण्याची इच्छा असते परंतु त्या सतत मातृ दुग्ध पेढीत येऊ शकत नाहीत.

या वाहिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्याचे संकलन करू शकतो. ज्या बाळांना दूधाची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी या सेवेच्या माध्यमातून आम्ही ते पोहोचवू शकतो.

मिल्क बँक सुरू झाल्यापासून आतापर्यंत 10 हजारांहून अधिक मातांनी सुमारे 2300 लिटर दुध मातृदुग्ध पेढीत दान केले आहे. याचा एकूण 15 हजाराहून अधिक गरजू नवजात बालकांनी लाभ घेतला आहे.

सुमारे 1860 लिटर दुधाचे वितरण करण्यात आले आहे. आता जो कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्या अनुषंगाने सर्व मार्गदर्शक तत्वाचे पालन करून व जबाबदारीने ही अमृतवाहिनी उपयोगात आणणार आहोत, असे मत प्राध्यापक व यशोदा मातृ दुग्ध पेढीचे प्रमुख डॉ. शैलजा माने यांनी व्यक्त केले.

यशोदा अमृतवाहिनीच्या उदघाट्न प्रसंगी रोटरी क्लब ऑफ निगडी अध्यक्ष विजय काळभोर, सचिव प्रणिता अलुरकर, अध्यक्ष रवी राजापूरकर, राणू सिंघानिया, डॉ. शुभांगी कोठारी, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर केशव मणगे तसेच डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ. वत्सला स्वामी, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, संचालक कॉर्पोरेट डॉ. पी एस गर्चा, उपसंचालक कॉर्पोरेट डॉ. जयदीप, वैद्यकीय अधीक्षक डॉ एच. एच. चव्हाण, बालरोग विभाग प्रमुख डॉ. शरद आगरखेडकर, शल्य विभाग प्रमुख डॉ शहाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like