Nigdi: रिकामे परिवाराकडून सामाजिक बांधिलकी; मुलीच्या विवाहानिमित्त वसतिगृहासाठी आर्थिक मदत

Nigdi: social commitment from rikame family; Financial assistance for hostel for daughter's marriage सामाजिक बांधिलकी जपत राजगुरूनगर विश्व हिंदु परिषदेच्या वनवासी विद्यार्थी वसतिगृहासाठी आर्थिक मदत केली.

एमपीसी न्यूज- निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांची कन्या डॉ. वसुंधरा रिकामे हिचा (दि.29 जून) रोजी अ‍ॅड. अनुपम संभुस यांच्याबरोबर विवाह झाला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तसेच शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत राजगुरूनगर विश्व हिंदु परिषदेच्या वनवासी विद्यार्थी वसतिगृहासाठी आर्थिक मदत केली.

या विवाह सोहळ्यामध्ये सत्कार, आहेर, मानपान असा अनावश्यक खर्च टाळण्यात आला. शिल्लक रक्कम पाच हजार रुपये सामाजिक जाणिवेच्या भावनेतून राजगुरूनगर विश्व हिंदु परिषदेच्या वनवासी विद्यार्थी वसतिगृहाला देण्यात आली.

त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले व वधुवरांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. विश्व हिंदू परिषदेचे दिलीप देशपांडे, सदाशिव रिकामे यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.