Nigdi : शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभाग व निसर्गमित्र विभागाच्या (Nigdi) वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रविवारी दुपारी दोन वाजता सावरकर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेमध्ये 135 मूर्तिकारांनी स्वतःच्या हाताने सुबक व सुंदर गणेश मूर्ती बनवल्या. या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी पुरेशी भिजवलेली शाडू माती व अन्य साहित्य मंडळाच्या वतीने सर्वांना पुरविण्यात आले.

मूर्तिकार चेतन हिंगे, मृणालिनी पाटील आणि मनीषा नातू यांनी प्रात्यक्षिकासह सर्वांना मार्गदर्शन केले. निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्लास्टर ऑफ  पॅरिस च्या मुर्तीऐवजी मातीच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करावी, घरच्या घरी विसर्जन करण्याचे आवाहन केले.

Sangavi : सांगवीत शुक्रवारपासून शिवमहापुराण कथा सोहळा

या कार्यशाळेमध्ये आठ वर्षे वयाच्या मुलांपासून 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी या मूर्तीमध्ये स्थानिक वृक्षांच्या बिया ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन केल्यानंतर ही माती आपल्या कुंडीमध्ये ठेवल्यास त्यातील बियांमधून तयार होणारे झाड सदैव आपल्या सोबत राहील व श्रीगणेशाचे स्मरण होईल ही या मागची संकल्पना असल्याचे यावेळी संयोजकांनी सांगितले.

कार्यशाळेचे हे बारावे वर्ष असून पुढील रविवारी म्हणजेच दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी या सर्व मूर्तींना नैसर्गिक रंग देण्यात येतील. अत्यंत उत्साहात संपन्न झालेली ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी वैदेही पटवर्धन, दीपक पंडित, मनेश मस्के, विजय सातपुते, अश्विनी अनंतपुरे, नेहा साठे, हर्षदा पोरे, शितल गोखले, संपदा पटवर्धन, सुखदा भौंन्सुले, अनुजा वनपाळ, माधुरी मापारी, मानसी म्हस्के, शारदा रिकामे, शैलेश भिडे, निता जाधव, स्नेहल पानसे, अनघा देशपांडे, वैशाली आमले, सुजित गोरे, दिपक नलावडे आदींनी विशेष परिश्रम (Nigdi)  घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.