Nigdi : चोरट्यांनी घरफोडी करीत घरात पार्क केलेली दुचाकी पळविली

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि घरात पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना आकुर्डी, प्राधिकरण येथे बुधवारी (दि. 18) उघडकीस आली.

मनोज मानसिंग जाधव (वय 37, रा. एकता चौकाजवळ, प्राधिकरण, आकुर्डी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांचे घर 13 ते 18 नोव्हेंबर दरम्यान बंद होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटाचा दरवाजाच उचकटून आतील सोन्या-चांदीचे दागिने व हॉलमध्ये पार्क केलेली दुचाकी असा एकूण एक लाख 26 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.