Nigdi : चप्पल दुकाना बाहेर काढण्यास सांगितल्याने वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर दुकानदाराने चपला बाहेर काढण्यास ( Nigdi ) सांगितले. या कारणावरून टोळक्याने दुकानाबाहेरील वाहनांची तोडफोड केली. ही घटना निगडी मधील रुपीनगर येथे घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुपीनगर येथील एका कपड्याच्या दुकानात पाच जणांचे टोळके गेले. मात्र पाऊस सुरू असल्याने दुकानदाराने चपला बाहेर काढण्यास सांगितले. याचा राग आल्याने पाच जणांच्या टोळक्याने दुकानासमोरील वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
व्यापाऱ्यांकडून बंदची हाक
टोळक्याने केलेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर रुपीनगर परिसरातील व्यापाऱ्यांनी रविवारी (दि. 9) बंद पाळण्याची हाक दिली आहे. या बंदला काही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून ( Nigdi ) रविवारी अनेक दुकाने बंद ठेवली आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.