Pimpri : मोकाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला बेड्या

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे भर दिवसा हवेत गोळीबार आणि कोयत्याने वार करत खून करणाऱ्या (Pimpri )आरोपीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोकाची कारवाई केली. या मध्ये आरोपी फरार होता. त्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

विशाल उर्फ दाद्या मरीबा कांबळे (वय 38, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune :  ‘ नक्षत्र वृक्ष’ कार्यक्रमातून साहित्यातील त्रयींच्या आठवणींना उजाळा

डिसेंबर 2022 मध्ये आरोपी विशाल कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी विशाल गायकवाड याचा रामनगर चिंचवड येथे खून केला. यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. मात्र मुख्य आरोपी विशाल कांबळे हा फरार होता. दरम्यान या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 (मोका) अंतर्गत कारवाई केली.

आरोपी विशाल कांबळे हा हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबे गावात आला असल्याची माहिती पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि कानगुडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी विशाल कांबळे याच्यावर पिंपरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद (Pimpri )आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.