Nigdi : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणा-या महिलेला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – मुलाला दोघांनी मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला लोखंडी रॉडने मारून जखमी केले. तसेच एक मुलगाही यात जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी सहाच्या सुमारास ओटास्किम, निगडी येथे घडली.

ललीता बाळू जाधव (वय 36, रा. राहुलनगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा तेजस याला दोन दिवसांपासून शाळेत दोन मुलांनी मारहाण केली. मारहाण का करता, असा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने त्यांना लोखंडी रॉड मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा हेमंत विडेकर यालाही जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.