Nigdi : देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेची बस प्रवासात पर्स चोरीला

एमपीसी न्यूज – देवदर्शनासाठी पीएमपीएमएल बसने (Nigdi) प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स प्रवासात चोरीला गेली. पर्समध्ये 44 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरीला गेली.हि घटना मंगळवारी (दि.24) निगडी-लोणावळा बसमध्ये घडली.

महिलेने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुणे-सोलापूर लोहमार्गाच्या दुरुस्तीसाठी घोरपडी रेल्वे फाटक गुरुवारी राहणार बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Nigdi) या वाघजाई देवीच्या दर्शनासाठी निगडी-लोणावळा बसने जात होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोराने फिर्यादीच्या पर्समधील 1 तोळे वजनांची 40 हजार 500 रुपयांची सोन्याची साखळी, 4 हजार 500 रुपये रोख असा एकूण 40 हजार 500 रुपयांचा एवज चोरीला गेला आहे. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.