Maval : कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कोणताही विद्यार्थी शालेय फी भरली नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये असे मत सुनील शेळके यांनी व्यक्त  केले.

सुनिल शेळके फाऊंडेशन व  ज्ञानगंगा कॉम्प्यूटर क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या गेलेल्या ‘स्मार्ट कॉम्प्यूटर एक्सपर्ट’ या अभियानाचा प्रमाणपत्र वाटप समारंभ व 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज कामशेत येथे पार पडला. अध्यक्षस्थानी सुनिल आण्णा शेळके हे होते. तळेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके याकडून या विद्यार्थ्यांस मोफत प्रशिक्षण देण्यात आले होते.

यावेळी  विठ्ठल आसवले, मधुकर महाराज वाघुले, रोहिदास शिंदे (अध्यक्ष पु.जि.पो.पाटील), सुवर्णा  कुंभार (सभापती), जनाबाई पवार (ग्रा.पं.सदस्या),  बबनराव मोहोळ, नथू   इंगवले, ज्ञानेश्वर कोंडे, दत्तात्रय मालपोटे, दत्ता शिंदे, नामदेव शेडगे, विजय गायकवाड, बाळासाहेब दळवी, रामदास सातकर, मिना मावकर, रुपाली शिनगारे आदी  उपस्थित होते.

संगणक क्लासमध्ये उत्तीर्ण झालेल्या व 10 वी व 12 वी परीक्षेमध्ये  उत्तीर्ण  झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत पालक वर्गही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महादेव वाघमारे  यांनी केले तर ह.भ.प दिलीप महाराज  खेंगरे  यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.