Odisha : ओडिशात पुन्हा मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले

एमपीसी न्यूज -ओडिशातील बालासोर दुर्घटनेला तीन (Odisha ) दिवस झाल्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरळीत झाली असतानाच पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. ओडिसा  राज्यातील बारगढ  जिल्ह्यात एका मालगाडीचे पाच डबे रुळावरुन घसरले आहेत.सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Pimple Nilakh : वास्तव आणि कल्पना यांचा समन्वय आनंददायी – प्रा. तुकाराम पाटील

ओडिशा राज्यातील बारगढ जिल्ह्यातील मेंधापळी येथे ही घटना घडली आहे. मालगाडी आणि त्यातील सामानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. एका सिमेंट फॅक्ट्रीकडून चालवण्यात येणाऱ्या मालगाडीचे काही डब्बे फॅक्ट्री परिसरात असलेल्या रुळावरून घसरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.