Pune : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करणाऱ्या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा

एसपीसी न्यूज- राजकीय पदाचा गैरवापर करीत शिवीगाळ करुन वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या एका इसमाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि 23) दुपारी दोनच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी वाहतूक पोलीस कर्मचारी किशोर शिंदे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेजबाबदारपणे विरुद्ध दिशेने मोटारसायकल चालविणाऱ्या दुचाकीस्वाराला किशोर शिंदे यांनी अडवले असता संबंधित इसमाने एका राजकीय पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष असल्याचे ओळखपत्र दाखवून पावती करु नये म्हणुन राजकीय पदाचा गैरवापर करीत शिवीगाळ करुन शिंदे यांना धक्काबुक्की करत उद्धट वर्तन केले. डेक्कन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.