Pune : दुचाकीस्वाराला चोरट्याने 42 हजाराला लुटले

एमपीसी न्यूज- एरंडवणे परिसरातील घरकुल लॉन्स समोरील डी.पी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना एका अनोळखी इसमाने दमदाटी करून दुचाकीस्वाराजवळील रोख रकमेसहित 42 हजारांचा ऐवज लुटून नेला. ही घटना काल, मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान घडली.

खुशाल अव्हाळे (वय 37, राहणार कोल्हेवाडी, सिंहगड रोड) यांनी या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशाल अव्हाळे हे मोटारसायकल वरुन जात असताना एक अनोळखी इसम दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आला. ‘तू चुकीच्या दिशेने जात आहेस’ असे म्हणुन अव्हाळे यांना शिवीगाळ व मारहाण करु लागला. तसेच त्यांच्याकडील 10 काळ्या रंगाचे जोधपुरी कोट व खिशातील रोख 30 हजार रुपये असा एकुण 42 हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला. अलंकार पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.