Pimple Guruv News : एकच फ्लॅट दोघांना विकला, कर्ज काढताना पडले पितळ उघडे

एमपीसी न्यूज – एकच फ्लॅट दोघांना विकला असल्याचा धक्कादायक प्रकार हा फ्लॅटचे कर्ज काढत असताना उघड झाला(Pimple Guruv News)आहे. हा प्रकार सन 2017 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.

ऋतुराज विलास सूर्यवंशी (रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime news : ज्येष्ठ नागरिकास धमकावून लुटणाऱ्यास 24 तासात अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यवंशी याने दत्तनगर, वाकड येथील सिद्धिविनायक सोसायटीमधील एक फ्लॅट फिर्यादी यांना विकला. त्यानंतर आरोपीने तोच फ्लॅट प्रतीक विवेक वैद्य आणि नेहा वैद्य यांना विकला असल्याचे दाखवून त्यावर आवास स्मॉल फायनान्स, शाखा हडपसर येथून 14 लाख 11 हजार 845 रुपये कर्ज घेतले. दरम्यान फिर्यादी यांना मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने राहत्या फ्लॅटवर कर्ज घेण्यासाठी चौकशी केली असता त्यांच्या फ्लॅटवर पूर्वीचेच कर्ज थकले असल्याचे निदर्शनास आले. आरोपीने कर्ज काढून ते न भरता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस (Pimple Guruv News)तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.