Pimpri News : मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – कै. सौ. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या (Pimpri News) स्मरणार्थ माजी नगरसेवक संदीप वाघेरे व लोकमान्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. 170 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

पिंपरीगावात झालेल्या या शिबिरामध्ये हाडां वरील उपचार व शस्त्रक्रिया, लिगामेंट रिकन्ट्रक्शन, मणक्यावरील उपचार व शस्त्रक्रिया, हृदयाचे आजार व शस्त्रक्रिया, पोटाचे आजार व शस्त्रक्रिया, किडनी स्टोन वरील उपचार व शस्त्रक्रिया, जनरल मेडीसीन ( ब्लड प्रेशर, डायबेटीस, थायरॉईड ) इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Pune Crime news : ज्येष्ठ नागरिकास धमकावून लुटणाऱ्यास 24 तासात अटक

या  शिबिराचा 170 नागरीकांनी लाभ घेतला. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सवलतीच्या दरात व गरजू गरीब रुग्णांसाठी (Pimpri News) मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन वाघेरे, शुभम शिंदे, विठ्ठल जाधव, रोहन वाधवानी, रंजनाताई जाधव, अश्विनी लोहार, अपूर्वा खोचाडे, दीपक मनेरे यांनी केले. तसेच लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. अर्चना कुडे व डॉ. आशुतोष दुबे व सहकारी यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.