Pune Crime news : ज्येष्ठ नागरिकास धमकावून लुटणाऱ्यास 24 तासात अटक

एमपीसी न्यूज-संक्रांतीच्या खरेदी करता आलेल्या ज्येष्ठ नागरिकास (Pune Crime news )धमकावून लुटणाऱ्यास 24 तासात अटक करण्यात खडक पोलिस ठाण्याच्या तपास पथकास यश आले आहे.याबाबत आंबेगाव येथील ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी समीर उर्फ मेहबूब शेख(वय 43 वर्षे, रा. भवानी पेठ, पुणे )या आरोपीला अटक करण्यात आले  आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जानेवारी 2023 रोजी ते खरेदी करता मंडई येथे गेले होते व तेथून पायी चालत बाजीराव रोडच्या दिशेने जात असताना दुपारच्या सुमारास चिंचेची तालीम जवळ, शुक्रवार पेठ, पुणे येथे सार्वजनिक रोडवर दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीला आणि धमकावून त्यांच्याकडून 2,500 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरी करून नेली. याबाबत खडक पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा सक्षम असणे गरजेचे -चंद्रकांत दळवी

 ज्येष्ठ नागरिकास भर दिवसा अशा पद्धतीने धमकावून लुटण्याचा प्रकार घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे  यांच्या मार्फत तात्काळ दोन तपास पथके तयार केली व त्यांना तपासाबाबत सूचना दिल्या. या पथकांनी लुटमार करणाऱ्या सराईत चोरट्याचा वेगाने व शिताफीने माग  काढून गुन्ह्यात आरोपी समीर शेख, वय 43 वर्षे, रा. भवानी पेठ याला 15 जानेवारी 2023 रोजी अटक करण्यात( Pune Crime news)आले आहे.

या आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारे लुटमार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने अधिक तपास चालू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1, पुणे, संदीपसिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश गोवेकर, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर, पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, अक्षयकुमार वाबळे, नितीन जाधव, महेश पवार, महेश जाधव, योगेश चंदेल यांच्या पथकाने (Pune Crime news)केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.