Pune News : सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा सक्षम असणे गरजेचे -चंद्रकांत दळवी

एमपीसी न्यूज : “गावाच्या विकासात पायाभूत सुविधा, आर्थिक आणि मानव विकास यावर भर द्यायला हवा. त्यातूनच गावाचा सर्वांगीण विकास शक्य आहे,” (Pune News) असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले. जाणीव युवा फाउंडेशन आयोजित मानव निर्माण शिबीरात दळवी तरुणांशी संवाद साधत होते.

तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होण्यासाठी ‘जाणीव’तर्फे वंचित विकास संस्थेच्या वडगाव शिंदे (लोहगाव) येथील ‘नीहार आनंद निवास’ येथे हे शिबीर आयोजिले होते. ‘गावाच्या विकासात तरुणांचा सहभाग’ या विषयावर दळवी यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्यांसाठी काम करताना स्वतःचे दुख विसरता येते. गावांमध्ये आधी काम करावे नंतर नेता बनावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

जाणीव युवा मार्फत व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण, आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रमांसह गेली आठ वर्षे मानव निर्माण शिबीर घेतले जाते. स्वतःमधील योग्य गुण ओळखून सद्यस्थितीत चालू असलेल्या विविध गोष्टींशी जुळवून घेत त्याकडे अभ्यासात्मकपणे पाहणे गरजेचे असते, सामाजिक भान जागृत करताना स्वतः आधी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन सामाजिक जीवनात कसे हातभार लाऊ शकतो याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आल्याचे संयोजक डॉ. श्रीकांत गबाले यांनी सांगितले.

Chakan Accident : रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तरुणाला कारची धडक, तरुणाचा मृत्यू

शिबिरात ‘सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखताना’ आणि ‘नैतिकता आणि मूल्य’ यांवर डॉ. श्रीकांत गबाले, ‘सामाजिक क्षेत्रातील आव्हाने आणि संधी’वर वंचित विकासच्या कार्यकारी संचालिका मीना कुर्लेकर, ‘आर्थिक जागरूकता’वर सनदी लेखापाल अनुप ताबे, (Pune News) ‘श्रीकृष्ण गीतेमधील मार्गदर्शन तत्वे’वर वास्तुविशारद व व्यवस्थापन तज्ञ अक्षय कुर्लेकर, ‘राजकारणाबाबत युवकांचा दृष्टीकोन’वर माध्यम व जनसंपर्क सल्लागार वरुण पालकर, ‘सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील पत्रकारिता’वर महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी, ‘पुढे काय?’वर नरेंद्र नायडू, तर ‘तणावमुक्त जीवन’वर विशाल धारवाड यांनी मार्गदर्शन केले.

‘इंडस्ट्री 5.0’, ‘साइबर सुरक्षा’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’, ‘भारत @75’ आदी विषयांवर तरुणांनी सांघिक सादरीकरणामार्फत विचारांचा उहापोह केला. राज्याच्या विविध भागातील 25 तरुण-तरुणींनी यात सहभाग घेतला, असे मयूर गाडेकर यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.