Chinchwad News : घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराबाबत शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रदर्शन

एमपीसी न्यूज – ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धती, त्याबाबतच्या वेगवेगळ्या यंत्रणांची माहिती, सांडपाणी प्रक्रियांची साधने आणि उपकरणांची (Chinchwad News) नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत ‘कचरा विलगीकरण व खतनिर्मिती प्रदर्शन’ (रिसायकलिंग अॅन्ड वेस्ट एक्सपो) भरविण्यात आले आहे.

Pune News : सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा सक्षम असणे गरजेचे -चंद्रकांत दळवी

ऑटो क्लस्टर सभागृहात तीनही दिवस सकाळी 11 ते 7 या वेळेत प्रदर्शन असेल. त्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत निशुल्क प्रदर्शन आयोजित केले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मधील तरतुदीनुसार नागरिक व व्यावसायिक यांनी घर, परिसर, व्यवसाय इत्यादी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे बंधनकारक आहे.

काय असणार प्रदर्शनात?

# घनकचरा प्रक्रिया आणि सांडपाणी प्रक्रियांची साधने, उपकरणे
# घनकच-यावर प्रक्रिया करणा-या अनेक नामांकित संस्थांचा सहभाग
# कच-याचे जैविक खतात कसे रुपांतर करावे याबाबत मार्गदर्शन, प्रात्यक्षिक
# कच-यावर प्रक्रिया करणे आणि ते पुनर्चक्रण करण्याबाबतची माहिती
# कच-यावर प्रक्रिया कशी करायची त्याची माहिती
# सांडपाणी पुनर्वापराच्या तंत्राची माहिती
# कच-यातून खत निर्माण करणे
#ई-वेस्ट आणि पुनर्वापराची माहिती

कोठे आणि कधी होणार प्रदर्शन?

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या हॉलमध्ये
20, 21, 22 जानेवारी 2023 रोजी
तीनदिवस सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रदर्शन सुरु राहील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.