Chakan Accident : रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तरुणाला कारची धडक, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कडेला बोलत (Chakan Accident) उभारलेल्या 29 वर्षीय तरुणाला वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यामध्यो तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात संक्रांती दिवशी म्हणजे रविवारी (दि.15) वासोली फाटा ते आंबेठाण रोडवर सायंकाळी घडला.

याप्रकऱणी नितीन रामकृष्ण चिंचोळे (वय 31 रा. महाळुंगे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.16) फिर्याद दिली असून कार चालक राहूल दिलीप कुबडे (रा. कुरकुंडी, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मयत तरुणाचे नाव हे निवृत्ती संतोष बांगर (वय 29 रा.खेड) असे आहे.

PCMC : … तर नाईलाजाने थकबाकीदारांची जंगम मालमत्ता जप्त करणार; महापालिकेचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची दुचाकी रस्त्याच्या (Chakan Accident) बाजूला घेऊन लघुशंकेसाठी थांबले. यावेळी निवृत्ती व त्याचा मित्र सिद्धार्थ कोरडे देखील फिर्यादीसोबत होते. निवृत्ती व सिद्धार्थ हे रस्त्याच्या कडेला बोलत उभे असताना आरोपी याने त्याच्या ताब्यातील (एमएच 15 सी.डी.9145) कार हयगयीने व वेगाने चालवत निवृत्ती यांना जोरदार धडक दिली. यात निवृत्ती गंभीर जखमी झाला.

आरोपी तेथे न थांबता पळून गेला. दवाखान्यात उपचारासाठी नेले असता निवृत्ती याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावरून कार चालक राहूल कुबडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.