Talegaon : जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 29) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव (Talegaon) दाभाडे येथे घडली.

PCMC : महापालिका नोकरभरती! चार पदांच्या 52 हजार उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा

याप्रकरणी पोलीस अंमलदार कृष्णा वाबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे पायोनियर हॉस्पिटलच्या समोर भरधाव वेगात जाणाऱ्या एका वाहनाने पादचारी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.