PCMC : महापालिका नोकरभरती! चार पदांच्या 52 हजार उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विविध विभागांतील ब आणि क गटातील 15 पदांच्या 388 जागांसाठी मे मध्ये घेतलेल्या परीक्षेचा पूर्ण निकाल अद्यापही लागला नाही. 11 पदांचा 7 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झाला असताना उर्वरित 4 पदांच्या निकाल रखडला. याकडे 52 हजारपेक्षा जास्त परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

Junnar : आमदार अतुल बेनके बनले राखीमॅन

महापालिकेच्या विविध विभागातील 388 जागांसाठी राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर टाटा कन्स्लटन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) माध्यमातून 26, 27 व 28 मे परीक्षा झाली. 55 हजार 82 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या पदासाठी परीक्षा घेतली होती.

यापैकी 11 पदांच्या 35 (दि.7) ऑगस्ट निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांची निकालाची 52 हजारपेक्षा जास्त उमेदवारांना निकालाची अद्याप प्रतिक्षाच आहे. त्यामुळे उमेदवारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या 388 जागांसाठी झालेली परीक्षा ऑनलाइन होती. परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे परीक्षार्थींना त्वरीत निकाल लागण्याची अपेक्षा होती. मात्र, युपीएससीची तयारी करणाऱ्या 83 उमेदवारांची 17 जुलैला परीक्षा झाली. त्यानंतर 11 पदांच्या 35 जागांसाठी दि.7 ऑगस्टला निकाल जाहीर झाला.

त्यानंतर 4 पदांचा निकाल स्वातंत्र्य दिनापूर्वी लावण्याचा मुहूर्त प्रशासनाने दिला होता. मात्र, हाही मुहूर्त हुकला असून एका स्वाक्षरीमुळे निकाल बाकी असल्याची चर्चा पालिका वतुर्ळात सुरू आहे. त्यामुळे पालिकेने त्वरीत निकाल जाहीर करण्यास संबंधित एजन्सीला सूचना द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.