Mahalunge : कंपनी परिसरातून 92 लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कुरळी येथील सॅनी हेवी इंडस्ट्रीज इंडिया (Mahalunge) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून चोरट्यांनी 91 लाख 94 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी उघडकीस आली.

Junnar : आमदार अतुल बेनके बनले राखीमॅन

श्रीकांत विजयराव देशमुख (वय 40, रा. मोशी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख हे सॅनी हेवी इंडस्ट्रीज या कंपनीत सीनियर एक्झिक्यूटिव्ह एडमिन पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीत ठेवलेले 91 लाख 94 हजार 377 रुपये किमतीचे एक्सावेटर कंट्रोल डिस्प्ले पार्ट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत (Mahalunge) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.