Chakan News : पीव्हीसी रॉ मटेरियल विक्रीच्या बहाण्याने व्यापार्याची साडेतीन लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – पीव्हीसी रॉ मटेरियल विक्रीच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने चाकण येथील एका व्यापाऱ्याला साडेतीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार 19 सप्टेंबर ते 23 डिसेंबर 2021 या कालावधीत कुरूळी येथे घडला.

खुमाराम खंगार जी चौधरी (वय 50 रा पिंपरी) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार 7256016781 या मोबाईल क्रमांक दारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शिवशक्ती एक्सपोर्ट नावाने उत्तराखंड राज्यातून पीव्हीसी रॉ मटेरियल विक्री करत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. आरोपीकडील तीस टन पीव्हीसी रॉ मटेरियल विक्री करायचे आहे, असे सांगून विजिटिंग कार्ड व एसटी नंबर, मालाचे फोटो आरोपीने फिर्यादी यांना व्हाट्सअप द्वारे पाठवले. तुम्हाला हवा असलेला पीव्हीसी रॉ मटेरियल माल तयार असून मी तुम्हाला तो पाठवितो, असे सांगून व्यवहार ठरवला. त्यामध्ये मालाचे अर्धे पैसे अगोदर देण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी साडेतीन लाख रुपये आरोपीच्या खात्यावर आरटीजीएस आणि एनएफटी द्वारे ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना मालाची डिलिव्हरी न देता तसेच त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.