Talavade News : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – टपरीमध्ये बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्या एकास सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 24) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास तळवडे येथे करण्यात आली.

दिलीप चंदीप्रसाद यादव (वय 19, रा. तळवडे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह निलेश (वय 30, रा. शिवाजी चौक, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक भगवंता मुठे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप यादव यांची तळवडे येथे पानटपरी आहे. त्याने त्याच्या टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली असता पोलिसांनी शुक्रवारी सकाळी छापा मारून कारवाई केली. यामध्ये आरोपीच्या टपरी मधून 79 हजार 613 रुपये किमतीचा गुटखा मिळवून आला. आरोपी निलेश याने आरोपी दिलीप याला गुटखा पुरवला असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.