Pimpri : पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची घाई नाही – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते. त्यानुसार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आजपासून कार्यान्वित करण्यात येत आहे. आयुक्तालय सुरू करण्यासाठी कोणताही विलंब झाला नाही आणि घाईसुद्धा झालेली नाही. सर्व काही योग्य वेळेत सुरू असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आज (बुधवारी) कार्यान्वित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री बापट बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, इरफान सय्यद, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

गिरीश बापट म्हणाले, वाढते शहरीकरण, लोकसंख्या आणि औद्योगिक विकास पाहता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा पिंपरी चिंचवडकरांना आम्ही शब्द दिला होता. पिंपरी चिंचवड शहर ग्रामीण आणि शहरी या दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. त्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय गरजेचे होते. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचेच फलित म्हणून आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित होत आहे. भाजप सरकारने पिंपरी चिंचवडकरांना दिलेला शब्द पळाला आहे.

शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि शासन यापुढील काळात देखील कटिबद्ध असणार आहे. आयुक्तालयाच्या मुख्यालयाचे काम सुरू असून लवकरच आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येतील. आयुक्तालयाचे कामकाज आजपासून सुरू होत आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होईल. शहरात कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी शहरातील सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, प्रशासन आणि नागरिक सहकार्य करतील, असेही बापट म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1